सुयश पाटीलला राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2022

सुयश पाटीलला राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक

सुयश उमाजी पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
       मुंबई येथे झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शुटींग चँपिअनशिप स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा बी. कॉम. ३ मधील विद्यार्थी सुयश उमाजी पाटील याने ५० मिटर पिस्टल सिव्हीलियन चँपिअनशिप व ज्युनिअर चँपिअनशिप या दोन प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. या यशस्वी कामगीरीमुळे भोपाळ येथे डिसेंबर, २०२२ मध्ये होणा-या राष्ट्रीय शुटींग स्पर्धेसाठी दुहेरी टिमचे सुयश पाटील महाराष्ट्रच्या टीमचे नेतृत्व करणार आहे.     

      या यशाबददल दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, क्रिडाविभाग प्रमुख डॉ. अर्जुन पिटुक, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. जी. पी. कांबळे, कार्यालयीन प्रमुख पी. ए. शेंडे व बी. जी. नाईक यांनी अभिनंदन केले. तो सद्या मुंबई येथे आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक अजित पाटील यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

No comments:

Post a Comment