![]() |
कु. आर्या साबळे कु. मधुरा मुरकुटे |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आजरा (उत्तुर) येथील ६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे च्या कु. आर्या साबळे हिची 'महापूर' तर मधुरा मुरकुटे हिचे 'आनंदयात्री' हे कथाकथन सादरीकरण होणार आहे. रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी उत्तूर ग्रामीण साहित्य संमेलनात बालसाहित्य मेळावा होणार आहे.
या बालमेळाव्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक बाबूराव शिरसाट व रजनी हिरळीकरप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य एम. एम. गावडे, शालेय समिती अध्यक्ष एम. एम. तुपारे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment