गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाची चर्चा! मोरबी येथील डॉ. राजेश पाटील यांच्या सुपुत्राचा विवाह सोहळा थाटात - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2022

गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाची चर्चा! मोरबी येथील डॉ. राजेश पाटील यांच्या सुपुत्राचा विवाह सोहळा थाटात


चंदगड : सी एल वृत्तसेवा, टीम (वडोदरा येथून)
अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ गुजरात चे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ द्वारका चे कोषाध्यक्ष, प्रतिथयश डॉक्टर व गुजरात राज्यात मराठी माणसांसाठी आधारस्तंभ ठरलेले, डॉ. राजूभाई उर्फ राजेश कल्लाप्पा पाटील व सौ. रेखा राजेश पाटील (मुळगाव कालकुंद्री, ता चंदगड, जि. कोल्हापूर) यांचे सुपुत्र चि‌.मिहीर यांचा शुभविवाह बाळासाहेब नारायण कोकाटे (मुळगाव- चिचोंडीपाटील, जिल्हा अहमदनगर) सध्या राहणार (बडोदा दशरथ गुजरात) यांची सुकन्या शुभांगी हिचा शुभविवाह वडोदरा- गुजरात येथे व स्वागत समारंभ मोरबी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

   छत्रपती शिवजयंतीसह महाराष्ट्रीयन सण, उत्सव साजरे करून मराठी संस्कृतीचे गुजरातमध्ये जतन करण्यात डॉ राजेश व त्यांचे बंधू सुरेश, दीपक व विजय पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.मिहीर व शुभांगी यांच्या लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन संस्कृती प्रमाणे पार पाडून परंपरा जपली. लग्नसमारंभात उपस्थित सर्व पुरुष, महिलांना बांधलेले कोल्हापुरी  फेटे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. मोरबी शहरात हा चर्चेचा विषय बनला होता.
  महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून महनीय व्यक्तींनी या लग्न समारंभास उपस्थिती लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. यात द्वारका महाराष्ट्र  मंडळ चे अध्यक्ष सुशिल कोरगावकर, सचिव एल.डी.वाघमारे,कोषाध्यक्ष मनिष परळीकर, सदस्य भरतभाई बोरसे, सुरेशभाई बोरसे, विशाल बोरसे निरंजन पाटील, घनश्याम आंबेरकर व बंधु  (जेतपूर) रविंद्र तिडके, योगेश वाघ (गांधीधाम- कच्छ), देवेंद्र निगडे व राजूशेठ पाटील (मुंद्रा- कच्छ), रविंद्र तिडके,श्रीपाद देशपांडे, दीपक बनसोडे, स्वप्नील मोरे, चंद्रकांत ढेरे, संजय प्रजापती, माणिकचंद कंपनी मॅनेजर नंदकुमार दायमा,कैलास करे,समीर केळकर संजय बोरा (मोरबी),  सुनिल ऐतवडेकर ( दत्तकृपा कन्स्ट्रक्शनचे मालक तथा अध्यक्ष- करवीर बिल्डर असोशियन कोल्हापूर), अमरनाथ शेनेकर (जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार कोल्हापूर), संतोष म्हेतर (गोविंदा डेव्हलपर्स कोल्हापूर), संदीप पाटोळे(हॅाटेल परख) राजेंद्र काटे (काटे डेरी फार्म कोल्हापूर), आर बी पाटोळे (चेअरमन गजानन नागरी पतसंस्था, कोल्हापूर), जसवंत बेंडकर, हरेशभाई चौहान, शिवराम जाधव (भावनगर) पंकज तावडे, मानसिंग पवार, प्रशांत गोराड (अमरेली), प्रशांत सतीश, दिलीप चौहाण (थान), सुनील थोरवे (वेरावळ- सोमनाथ), राजेंद्र वायंगणकर, हरीश बाईत जेतपूर, राजेंद्र मयेकर व परिवार रत्नागिरी, सतीश मांडवकर पाटण, चंद्रकांत पाटील (मुंबई पोलीस), विजय पाटील, राकेश पाटील तेऊरवाडी, श्रीकांत वै. पाटील (कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष  - शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र), मुंबई पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- नंदकुमार ढेरे, सी एल न्यूज चॅनेलचे संपादक- संपत पाटील, सदस्य तातोबा गावडा याशिवाय अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ जुनागड, राजकोट, अमरेली, सुरेंद्रनगर, द्वारका, सोमनाथ, भावनगर, जामनगर, अहमदाबाद, सुरत, बडोदा आदी  जिल्हा शाखांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. या लग्न सोहळ्यास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर, भरमूअण्णा पाटील (माजी रोहयो मंत्री, महाराष्ट्र राज्य), सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनीही संदेशपर शुभेच्छा दिल्या.



No comments:

Post a Comment