सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत कोवाड केंद्र शाळेचे अभूतपूर्व यश - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2022

सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत कोवाड केंद्र शाळेचे अभूतपूर्व यश

 

समूह गीत गायन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला केंद्र शाळा कोवाडचा चमू.

कोवाड: सी. एल. वृत्तसेवा
 कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रांतर्गत नुकत्याच कुमार विद्यामंदिर दुंडगे येथे झालेल्या सांस्कृतिक व किणी येथील क्रीडांगणावरील क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ गट इयत्ता १ ते ५ मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाडच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले.
 सांस्कृतिक स्पर्धेतील समूह गीत गायन व नाट्यीकरण विभागात प्रथम क्रमांक तर कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. क्रीडा स्पर्धेत कबड्डी विभागात उपविजेता,  क्षितिज विनायक राजगोळकर १०० मीटर धावणे मध्ये द्वितीय, तर ५० मीटर धावणे तृतीय. कुस्ती २५ किलो वजन गटात आदर्श विश्वास पन्हाळकर द्वितीय क्रमांक, मुली उंच उडी व ५० मीटर धावणे पूर्वा सोमनाथ पाटील द्वितीय क्रमांक.
समूह गीत, नाट्यीकरण व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांची चंदगड तालुकास्तरासाठी निवड झाली आहे.
वरील यश इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांशी सामना करुन मिळवले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, कविता पाटील, मधुमती गावस, भावना आतवाडकर, उज्वला नेसरकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य व पालकांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment