![]() |
शहीद जवान परशराम पाटील |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शहीद जवान परशराम सट्टूप्पा पाटील यांच्या 51 पुण्यतिथीनिमित्त रविवार दि. 11 रोजी कालकुंद्री येथे स्मारकाचे अनावरण होणार आहे. शहीद जवान परशराम हे 1 मराठा लाईट इन्फंट्री, जंगी फलटण मध्ये कार्यरत होते. 1971 मध्ये बांगलादेश येथे शत्रूशी लढताना ते जमालपूर बांगलादेश येथे शत्रूशी लढताना शहीद झाले आहेत. ते 17 फेब्रुवारी 1970 रोजी बेळगाव येथे भरती झाले होते तर 11 डिसेंबर 1971 रोजी ते शहीद झाले. रविवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता आदर्श यादव गल्ली व कालकुंद्री येथे त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यक्रम होणार आहे. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, आर्मी असोसिएशन कोल्हापूर, जिल्हा आजी-माजी वेलफेअर असोसिएशन चंदगड तालुका, आजी-माजी सैनिक संघटना यांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत. कालकुंद्री, ग्रामपंचायत, सर्व सेवा संस्था, सरस्वती विद्यालय मराठी विद्या मंदिर व ग्रामस्थ यांच्या वतीने सदर कार्यक्रम होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहीद जवान यांचे भाऊ व चंदगड महसूल विभागाचे निवृत्त सर्कल ऑफिसर लक्ष्मण सट्टूप्पा पाटील, वहिनी सुनंदा लक्ष्मण पाटील, बहिण आंबाक्का रामू दोड्डणावर (बाची, ता. बेळगाव), पुतणे परशराम ल. पाटील, पल्लवी परशराम पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment