बेळगुंदी येथे रविवारी मराठी साहित्य संमेलन, प्रा. डॉ. यशवंत पाटणे संमेलन अध्यक्ष, आमदार बेनके, आमदार राजेश पाटील यांना निमंत्रण - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2022

बेळगुंदी येथे रविवारी मराठी साहित्य संमेलन, प्रा. डॉ. यशवंत पाटणे संमेलन अध्यक्ष, आमदार बेनके, आमदार राजेश पाटील यांना निमंत्रण

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी तर्फे 17 वे मराठी साहित्य संमेलन  रविवार दि. 11 रोजी होत आहे . रविवार दि. 11 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत विविध कार्यक्रम होणार आहेत. सातारा येथील लेखक प्रा. डॉ. यशवंत संभाजी पाटणे हे संमेलनाध्यक्ष असतील. 

मरगाई देवस्थान  जवळील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कै. नागनाथ कोत्तापल्ले साहित्य नगरी येथे सदर संमेलन होणार आहे सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडी होईल  यानंतर संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम होईल. जि.  पं. माजी सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर काजू उद्योजक रामचंद्र पाटील स्वागताध्यक्ष  तर दीपप्रज्वलन कार्यक्रमाला बेळगुंदी ग्रामपंचायत अध्यक्ष हेमा हदगल, बीजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, प्रतीक गुरव, अशोक गावडा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत  यानंतर दुसरे सत्र 1.30 वाजता परिसंवाद होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक प्रा. वैजनाथ महाजन असतील. साहित्य आणि वर्तमानकाळ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. दि. बा. पाटील, डॉ. दीपक स्वामी, प्रा. भिमराव धुळुबुळू सहभागी होणार आहेत. तिसरे सत्र दुपारी 3 वाजता कवी संमेलन अध्यक्षपदी मिरज येथील डॉ. अनिता खेबुडकर तर कडोली येथील कवी बसवंत शहापूरकर सूत्रसंचालन करणार आहेत

चौथे सत्र 4.30 वा . कुटुंब रंगले काव्यात हा कार्यक्रम मुंबई येथील प्रा. विसूभाऊ बापट सादर करणार आहेत यानंतर पुणे येथील पीएसआय संजय कदम, डॉ. स्नेहल पाटील, भुजंग गावडे, विलास हुबळीकर, सानिका  कुन्नूरकर, ऋचा पावशे, रवळनाथ कणबरकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार अनिल बेनके, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.





No comments:

Post a Comment