कोकरे येथे शेजारच्या शेतात पाणी सोडण्यावरून मारामारी, एक जण गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2022

कोकरे येथे शेजारच्या शेतात पाणी सोडण्यावरून मारामारी, एक जण गंभीर जखमी

 


चंदगड / प्रतिनिधी

कोकरे (ता. चंदगड) येथे शेजारच्या शेतात बांध फोडून पाणी का सोडलेस म्हणून झालेल्या मारामारीत एकाची बेगडी मोडली. धोडिबा गणु कांबळे असे जखमी इसमाचे नाव असून धोंडीबा कांबळे याच्या फिर्यादीवरून सागर विठठल कांबळे याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी की धोंडीबा कांबळे व सागर कांबळे हे  एकाच गावचे राहणारे असुन एकमेकांचे शेजारी राहतात. धोंडीबा कांबळे हे घरासमोर बसलेले असताना आरोपी सागर याने फिर्यादी कांबळे यानातु सांडपाण्याचा बांध फोडुन पाणी पांडुरंग येळवटकर यांच्या शेतात का सोडलेस असे म्हणुन शिवीगाळी व दमदाटी करून धोंडीबा यांच्या छातीवर लाथ मारुन खाली पाडुन छातीवर पाठीवर दोन्ही हातास लाथाबुक्यांनी मारुन जखमी केले आहे. मारहानीत फिर्यादी कांबळे यांची बरगडी फॅक्चर होवुन गंभीर दुखापत झाली आहे.धोंडीबा कांबळे यांच्यावर  गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिक तपास पोहेकाॅ महेश बांबळे करत आहेत.
No comments:

Post a Comment