हलकर्णी येथे शेतीमधील धामनीचे झाड तोडल्याच्या कारणावरुन मारामारी, दोघेजण गंभीर - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2022

हलकर्णी येथे शेतीमधील धामनीचे झाड तोडल्याच्या कारणावरुन मारामारी, दोघेजण गंभीर

 


चंदगड / (प्रतिनिधी) 

हलकर्णी (ता. चंदगड) येथे शेतातील झाड तोडल्याचा कारणावरून दोघा शेतकर्‍यांत मारामारी झाली. ही घटना (गट नंबर २२) डाग नावाच्या शेतात घडली. या मारहाणीमध्ये विठ्ठल धाकलू ल्हासे व विक्रम विठठल ल्हासे हे दोघे पितापुत्र गंभीर जखमी झाले. जखमी विठठल ल्हासे यांच्या फिर्यादीवरून अनिल पांडुरंग कडुकर, विक्रम शंकर कडुकर, सुरेश नारायण कडुकर, पांडुरंग आप्पाजी कडुकर (सर्व रा. हलकर्णी) यांचेवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

     याबाबत पोलिसांतून मिळालेली बातमी अशी कि, विठ्ठल ल्हासे त्यांचा मुलगा विक्रम हे शेतामध्ये काम करीत असताना यातील अनिल कडुकर, विक्रम कडुकर, सुरेश कडुकर, पांडुरंग कडुकर यांनी हातामध्ये कोयता, खुरपे व लोखंडी रॉड असे घेवुन येवुन फिर्यादी व त्यांचा मुलगा विक्रम यांना तुम्ही आमचे शेतातील झाडे का तोडलीत असे म्हणुन विक्रम कडुकर याने विठ्ठल यांना खाली पाडुन शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. विक्रम ल्हासे यालाही अनिल कडुकर याने कोयत्याने डोक्यात मारले. सुरेश कडुकर यानेही लोखंडी रॉडने पायावर, हातावर व छातीवर मारले. तसेच विक्रम कडुकर याने खुरपे डोक्यावर व खांदयावर मारले. तर पाडुरंग कडुकर याने कोयत्याने व लाकडी टोन्याने पाठीवर मारून मुलगा विक्रम यास खाली पाडुन पुन्हा त्यांनी लाथाबुक्यांनी मारहान करुन तुम्हाला जिवंत सोडनार नाही अशी धमकी दिली. याबाबतची फिर्याद विठठल ल्हासे यांनी चंदगड पोलिसात दिली. त्यानुसार अनिल कडुकर, विक्रम कडुकर, सुरेश कडुकर, पांडुरंग कडुकर या आरोपीवर ३६१/२०२२ भा. द. वि. स. कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. काॅ. महेश बांबळे करत आहेत.
No comments:

Post a Comment