तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत किटवाड प्राथमिक शाळा प्रथम, आतापर्यंत पटकावले ४ वेळा अजिंक्यपद - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2022

तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत किटवाड प्राथमिक शाळा प्रथम, आतापर्यंत पटकावले ४ वेळा अजिंक्यपदकागणी : सी. एल. वृत्तसेवा

      मागील आठवड्यात होसूर् येथे संपन्न झालेल्या कालकुंद्री केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धेत मराठी विद्या मंदीर किटवाड शाळा अव्वल. सलग ४ वेळा जनरल चॅम्पियनशिप किटवाड कडेच राखून ठेवली. यानंतर संघाची तालुका स्तरीय निवड झाली. दि.12 व 13 डिसेंबर रोजी  दाटे येथे झालेल्या स्पर्धेत मराठी विद्या मंदिर किटवाड शाळेने कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

    दाटे येथे शालेय कब्बडी स्पर्धेत मोठ्या गटात मराठी विद्या मंदीर किटवाड पुन्हा ४ वेळा प्रथम आला. केंद्रस्तरावरील सर्व प्रथम संघात येथे सामने रंगले. यामधे तिसरा क्रमांक कार्वेच्या मराठी शाळेने तर दुसरा बागीलगे शाळा तर प्रथम किटवाड मराठी शाळा. या  विजेत्या संघाला मार्गदर्शक म्हणून अष्टेकर सर (मुख्याध्यापक) सागर पाटील सर, सर्व शिक्षक स्टॉप तसेच सतीश नरेवाडकर(आनंद स्मृती, ठाणे), सिद्राम मोदगेकर (राष्ट्रीय खेळाडू) आणि श्री ब्रह्मलिंग संघाने केले. सर्व गावकरी,तरुण वर्ग, मंडळे,पालक वर्गातून सर्वाचे खूप अभिनंदन होत आहे. यामधे अमन खंदाळकर, सचिन नरेवाडकर, महेश पाटील, प्रतिक रावजीचे, ज्ञानेश्वर पाटील, मानव पाटील, ओमकार जाधव, श्रेयस लाड, श्रेयस पाटील, विनायक मोदगेकर, महादेव, अवधूत या खेळाडूंचा सहभाग होता. केंद्राचे केंद्रप्रमुख बाळू प्रधान सर यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:

Post a Comment