मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण, शिनोळी बुद्रुक येथे 3 वाजता होणार आगमन - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2022

मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण, शिनोळी बुद्रुक येथे 3 वाजता होणार आगमन


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे शुक्रवार दिनांक 16 रोजी दुपारी 3 वा. सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी गडहिंग्लज येथेही ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. यानंतर कोवाड (ता. चंदगड) येथे त्यांचे स्वागत होईल. यानंतर ढोलगरवाडी येथे मंत्रालयीन अधिकारी उमेश पाटील यांच्या घरी

 भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दिवाकर पाटील हे ढोलगरवाडी येथे मंत्री देसाई यांचे स्वागत करणार आहेत. यानंतर ते शिनोळी येथील कार्यक्रमाकडे रवाना होतील. शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत. यानंतर चंदगड तालुक्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यक्रम घेणार आहेत. चंदगड पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दौऱ्याप्रसंगी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिनोळी येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते थेट सातारा जिल्ह्यातील पाटण या त्यांच्या गावी रवाना होणार आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांना वाय प्लस सुरक्षा असून महाराष्ट्र राज्यात मंत्री तसेच आमदारावर शाई फेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.




No comments:

Post a Comment