कायद्याची जनजागृती हि सुद्धा देशसेवाच - न्यायाधिश बिराजदार, हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2022

कायद्याची जनजागृती हि सुद्धा देशसेवाच - न्यायाधिश बिराजदार, हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडी येथे श्रमसंस्कार शिबिर

तावरेवाडी (ता. चंदगड) येथे श्रम संस्कार शिबिरात बोलताना चंदगडचे प्रथमवर्ग न्यायाधीश अमृत बिराजदार
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रसेवा म्हणजेच देशसेवा आहे.माणुस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कायदा जन्माला येतो. यातुनच भ्रूण हत्या कायदा आमलात आला. कायदा हा मानवा पुरता मर्यादित नाही. तर पृथ्वी तलवारील सर्व घटकांना लागू आहे. त्यामुळे कायदा पाळणे हे हि महत्त्वाचे आहे. पिडीत व्यक्तीसह कायदा सर्वासाठीच आहे. कायद्याची जनजागृती करणे हि एक प्रकारची देशसेवाच आहे. असे प्रतिपादन चंदगडचे प्रथमवर्ग न्यायाधीश अमृत बिराजदार यांनी  केले. 
   ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने तावरेवाडी (ता. चंदगड) येथे घेण्यात आलेल्या श्रम संस्कार शिबिरात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी प्रा. यु. एस. पाटील होते. प्रास्ताविक सानिका कलखांबकर हिने केले तर स्वागत अमोल गावडे यांनी केले.
    न्यायाधीश बिराजदार पुढे म्हणाले विना परवाना वाहने चालवू नका. कायदा मोडला जाईल असे वर्तन करू नका. ज्याला प्रश्न पडतात आणि तो त्याचा पाठलाग करून उत्तर शोधतो तो या पटलावर स्थिरावतो. तुम्ही तुमच्या  धेय्याची आताच ध्येय गाठ बांधा. मौज करा बापाच्या पैशावर पण तुमची कर्तबगारी दाखवा तरच जगाच्या पटलावर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. बेकारी प्रचंड आहे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. जर तुम्ही या सुर्योदयातून तगलात तरच तुमचा भविष्याचा सूर्योदय आहे. त्यामुळे परिक्षेपुरता अभ्यास करू नका. ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाची मदत होईल. यासाठी योग्य क्षेत्र निवडा ध्येय ठरवा. हे वय आयुष्याला दिशा देणारं आहे यासाठी समृद्ध साहित्याची सेवा करा. राष्ट्रीय सेवायोजना हा उपक्रम संयम शिस्तीचा धडा देणारा उपक्रम आहे. सेवा योजनेचे जतन करा, असेही बिराजदार यांनी सांगितले.
   यावेळी प्रा. यु. एस.पाटील यांनी आयुष्य सार्थकी लावण्यासाठी  ध्येय निश्चित पाहिजे. ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. तरच ते साध्य होते. आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध पदावर पोहचले पण अद्याप कोणी न्यायाधीश झाले नाही. त्यामुळे तुमच्यातील एखादा न्यायाधीश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
   यावेळी के. एन. धुमाळ, प्रवीण घोडेकर, शिवाजी हसबे, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. अंकुश नौकुडकर, प्रा. शाहू गावडे, डॉ. जे. जे. व्हटकर, सौ. सुवर्णा पाटील, राजू बागडी, दिलीप पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन इंद्रायणी पाटील हिने केले तर आभार महेश सांबरेकर यांनी मानले.





No comments:

Post a Comment