मंत्री शंभूराज देसाई शुक्रवारी शिनोळी बुद्रुक येथे, काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2022

मंत्री शंभूराज देसाई शुक्रवारी शिनोळी बुद्रुक येथे, काय आहे कारण?

 

शंभूराज देसाई

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे शुक्रवार दिनांक १६ रोजी दुपारी २ वा. सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला सीमा भागातील मराठी  भाषिक तसेच चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार यांचा प्रचारही होणार आहे. 

या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून शिनोळी बुद्रुक येथील लक्ष्मी मंदिर आवारात सभा मंडप घालण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment