चंदगड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा : गवसे, किटवाड, चिंचणे, तेऊरवाडी शाळांची चमक..!, पहा क्रीडा स्पर्धांचा संपूर्ण निकाल फक्त सी. एल. न्यूज वर - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2022

चंदगड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा : गवसे, किटवाड, चिंचणे, तेऊरवाडी शाळांची चमक..!, पहा क्रीडा स्पर्धांचा संपूर्ण निकाल फक्त सी. एल. न्यूज वर

कनिष्ठ गटातील कबड्डी अंतिम सामना नाणेफेक प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सौ सुभेदार, स्पर्धा पंच व शिक्षक प्रतिनिधी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक चंदगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा केंद्र शाळा दाटेच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील सांघिक वरिष्ठ गटातील कबड्डी मुले - विद्यामंदिर किटवाड, मुली- सोनारवाडी, खोखो विद्यामंदिर गवसे, मुली- सरोळी, रिले स्पर्धा मुले- विद्यामंदिर देवरवाडी, मुली- विद्यामंदिर कागणी. कनिष्ठ गट कबड्डी मुले- केंद्र शाळा दाटे, मुली- विद्यामंदिर आसगाव, खो खो मुले- विद्यामंदिर गवसे, मुली विद्यामंदिर झांबरे, यांनी सांघिक प्रकारात यश संपादन केले. वैयक्तिक धावणे प्रकारात विद्यामंदिर चिंचणे तर कुस्ती विभागात तेऊरवाडी आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. 

     स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. स्पर्धा विभाग प्रमुख तथा कालकुंद्री केंद्रप्रमुख बाळू प्रधान यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, बी आर सी स्टाफ, सर्व संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

     स्पर्धा पार पडण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक पतसंस्था, शिक्षक बँक, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे, गोविंद लक्ष्मण चांदेकर आदींकडून सहकार्य लाभले. 
       मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment