शिनोळी येथे १९ डिसेबरला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2022

शिनोळी येथे १९ डिसेबरला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील श्री धर्मवीर ग्रुपच्या वतीने सोमवारी १९ डिसेंबर २०२२ रोजी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १६ वर्षाखालील व खुल्या गटासाठी भरवण्यात आल्या आहेत. स्पर्धेसाठी ५ किमी अंतर ठेवले आहे.

     विजेत्या स्पर्धकांना ५५५५, ४४४४, ३३३३, २२२२, ११११, ७७७, ५५५, ४४४, ३३३ तर सोळा वर्षा खालील गटासाठी ३००१, २००१, १००१, ७०१, ५०१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक स्पर्धकांनी विक्रम करटे 9049861837, अनिकेत बोकमूरकर 8197847694, अभिषेक बोकमूरकर 9146612574 यांच्याशी संपर्क करून सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment