राशिंगच्या अपघातग्रस्ताला धर्मस्थळ बचतगट कडून २५ हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2022

राशिंगच्या अपघातग्रस्ताला धर्मस्थळ बचतगट कडून २५ हजारांची मदत

राशिंग : येथे अपघातातील जखमी बाबू बाबर यांना आर्थिक मदत देताना धर्मस्थळ बचतगटाचे अधिकारी व ग्रामस्थ.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      राशिंग, बुगटेआलूर (ता. हुक्केरी) येथील भक्तगण अयोध्या येथे देवदर्शनास गेले होते. त्यावेळी प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स बसला ट्रकने पाठीमागून जोराची धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात आलूर येथील सुतार दाम्पत्य मयत झाले होते. तर राशिंग येथील बाबू रामू बाबर हे पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च येणार होता. या पार्श्वभूमीवर धर्मस्थळ बचतगटाने धाव घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत दिली. 

         यावेळी धर्मस्थळ बचत गटाचे चिकोडी विभागाचे निर्देशक कृष्णा टी यांनी सांगितले की, या विभागातील धर्मस्थळ बचत गटाचे सदस्य असतील तर त्यांना कोणत्याही अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबरच राशिंग येथील रामलिंग देवालय जीर्णोद्धारासाठी २ लाख रुपये दिल्याचेही सांगितले. यावेळी योजना अधिकारी शकुंतला मॅडम, कणगंला विभागाचे सुपरवायजर महावीर, सेवा प्रतिनिधी वासंती कणसे, ग्रा. पं. सदस्य संजय कुरणे, सदस्या जयश्री कांबळे, शिवाजी जाधव, दत्ता कणसे, शिवाजी पालकर, सचिन कासार, शिवाजी यादव, दीपा कासार व बाबर कुटुंबीय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment