चंदगड नगरपंचायतीच्या स्वच्छता ब्रॅंड अम्बेसिटरपदी संजय साबळे - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2023

चंदगड नगरपंचायतीच्या स्वच्छता ब्रॅंड अम्बेसिटरपदी संजय साबळे

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

चंदगड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कौतुकास्यद योगदानाबद्दल नगरसेविका अनुसया दाणी यांच्या हस्ते संजय साबळे यांना स्वच्छ ब्रँड अम्बेसिटर म्हणून सन्मानित करण्यात आले.

     चिमणी वाचवा, प्लास्टिक हटवा मोहिम, बिया संकलन, सीड बॉल तयार करणे, औषधी वनस्पतीची लागवड, व संवर्धन, वाढदिवसाला रोप भेट देणे, पथनाट्य सादरीकरण, फटाके मुक्त दिवाळी, आषाढी एकादशीला वारकऱ्यांना रोपं भेट, पर्यावरण पुरक आकाश कंदिल, सायकलरॅली असे अनेक पर्यावरण संदर्भात उपक्रम साबळे यांनी राबविल आहेत..या सर्वाची दखल घेऊन चंदगड नगरपंचायत कडून त्पांना स्वच्छ ब्रॅड अम्बेसिब्द म्हणून सन्मानित केले.

यावेळी नगराध्यक्ष प्राची काणेकर, अभिजीत गुरबे, नेत्रदिपा कांबळे, अॅड विजय कडूकर, सचिन नेसरीकर अनंत हळदणकर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment