ग्रामपंचायतीच्या वतीने महिला कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2023

ग्रामपंचायतीच्या वतीने महिला कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण


नेसरी /सी. एल. वृत्तसेवा
ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने ग्रामपंचायत सावतवाडी तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) जिल्हा कोल्हापूर येथे महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये दहा प्रकार चे केक, २१ प्रकारचे मसाले,१० प्रकारचे आईस्क्रीम शिकवण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमला धन्वंतरी देसाई, जयकुमार देसाई, सावतवाडी तर्फ नेसरी चे सरपंच धोंडिबा नांदवडेकर, उपसरपंच अजित नांदवडेकर, अस्मिता सासुलकर, विद्या सासुलकर, ललिता नांदवडेकर, शोभा फगरे, संगिता लोखंडे, वंदना कातकर आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक सुषमा मेतील, तळेवाडीचे सरपंच सागर देसाई यांचे विषेश सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment