भाजपचे नेते माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड येथे आज कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

भाजपचे नेते माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड येथे आज कार्यक्रम

 

भरमुआण्णा पाटील

चंदगड / प्रतिनिधी 
भाजपचे नेते माजी मंत्री भरमुआणा पाटील यांचा ८७ वा वाढदिवस चंदगड येथील सोयरीक मंगल कार्यालयात मंगळवार दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील उपस्थित राहणार आहेत. 

या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, गडहिंग्लज बाजार समितीचे माजी अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, माजी सभापती बबनराव देसाई, भाजप युवा मोर्चाचे रविंद्र बांदिवडेकर, माजी सभापती शांताराम पाटील, सरपंच आर. जे. पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment