चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांचा राज्य महिला आयोगाकडून सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांचा राज्य महिला आयोगाकडून सन्मान

संतोष घोळवे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या राजकारण, समाजकारण आणि प्रशासन क्षेत्रातील व्यक्तींचा प्रतिवर्षी विशेष सन्मान करण्यात येतो. 

       चंदगड पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पेठ वडगाव (ता. हातकणंगले) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप ठोटावून अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

           त्याबद्दल त्यांचा २५ जानेवारी २०२३ या महिला आयोगाच्या ३० व्या वर्धापन दिनी सह्याद्री राज्य अतिथीगृह, बी. जी. खेर रोड, मलबार हिल, मुंबई येथे समारंभ पूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. या विशेष सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment