भरमु नांगनुरकर यांची मनसे ट्रक वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2023

भरमु नांगनुरकर यांची मनसे ट्रक वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड

भरमु नांगनुरकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        आमरोळी (ता. चंदगड) येथील रहिवासी व सध्या व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते भरमु विठोबा नांगनुरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण ट्रक वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. 

          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब यांच्या आदेशाने युवा नेते अमित ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय भाई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कुलाबा मनसे अध्यक्ष शेखर गव्हाणे, उपाध्यक्ष व कुलाबा विभाग अध्यक्ष शेखर गव्हाणे यांच्या सहकार्याने व प्रशांत गांधी यांच्या सहयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांनी श्री. नांगनुरकर यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

         सेनेच्या या पदाचा मान ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नांगणुरकर यांनी सांगितले आहे.पक्ष स्थापनेपासून निस्वार्थी व कट्टरतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उच्च पद देऊन एक प्रकारे गौरवच करण्यात आला.या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment