गोवा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2023

गोवा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कुठ्ठाळ्ळी-गोवा येथे स्वराज्य जननी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माॅंसाहेब जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी जिजामाता जिजाऊच्या प्रतिमेला हार घालून आणि ज्योत पेटवून झाली. मराठा सेवा संघ, गोवा प्रभारी शिवश्री बळवंत पाटील यांनी जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यागातूनच स्वराज्य उभं केलं. 

      स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आपल्या कुटुंबापासून दूर राहून स्वराज्य उभे करण्यासाठी राजकीय खेळी करत होते. निजामशाही, कुतुबशाही आणि इतर कोणी स्वराज्याकडे येणार नाहीत. याचा बंदोबस्त करत होते आणि त्यांचे हे महान कार्य आपण विसरून चालणार नाही.

        मराठा सेवा संघ, गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री रामचंद्र पाटील यांनी स्वराज्य आणि स्वराज्याचा इतिहास, ऐतिहासिक दाखले देऊन उलगडून दाखवला. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेबांचे वडील आणि सख्खे दोन भाऊ निजामाच्या दरबारामध्ये उभे कापले गेले आणि तेही मराठ्यांच्या कडूनच. असेच आम्ही सर्व मराठे, एक दुसऱ्यांना संपवत, दुसऱ्यांची राज्यं मोठी करत आहोत. त्यापेक्षा आपले स्वराज्य उभं करूया, या प्रेरणेतून त्यांनी बाळ शिवबाला  युद्धकौशल्, शस्त्र आणि शास्त्र याची सांगड, डावपेच, राजनीति, अथक परिश्रम, प्रचंड आत्मविश्वास, आपल्या लोकांची पारख, धाडस हे सारे शिकवून त्यांना छत्रपती केले. 

       इतक्या संघर्षातून स्वराज्य उभं केलं आणि आज आम्हाला सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घालत असते वेळी आम्ही देश सेवेसाठी कमी पडतो का? समाजाला एकत्र आणण्यासाठी कमी पडतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. याची सर्वांना आठवण करून दिली.मराठा सेवा संघ गोवा राज्य आणि त्यांचे इतर कक्षाचे पदाधिकारी जसे , शिवश्री भारत पाटील- प्रदेशाध्यक्ष, केशवराव भोसले सांस्कृतिक कक्ष, शिवश्री राम बिरजे-प्रदेशाध्यक्ष, समन्वय कक्ष आणि शिवश्री जगदीश रायजाधव- प्रदेशाध्यक्ष, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद  कक्ष, शिवमती मनीषा रामचंद्र पाटील- प्रदेशाध्यक्ष, वधुवर सुचक कक्ष. अखिल भारतीय मराठा जागृती मंच कुठ्ठाळी शाखेचे अध्यक्ष नामदेव शिंदे, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भरत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment