अलबादेवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे पाटील बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2023

अलबादेवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे पाटील बिनविरोध

 

राजाराम पाटील 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          अलबादेवी (ता चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे राजाराम पाटिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मी गुरुनाथ घोळसे होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांनी निवडणूक प्रक्रीया पार पाडली.

       यावेळी ग्रामपंचायत सदस्या समीक्षा इंगवले, अर्चना कोले, गिता दोरुगडे, लता घोळसे, मारुती कुडाळकर, विकास डांगे उपस्थित होते. आभार ग्रामसेवीका सुवर्णा वळवी यांनी मानले.

No comments:

Post a Comment