हलकर्णी महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2023

हलकर्णी महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विभागा अंतर्गत विश्व हिंदी दिवस कार्यक्रम संपन्न झाला.माजी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील यांनी हिंदी जागतिक भाषामध्ये प्रमुख असणारी भाषा आहे. जगामध्ये सर्वत्र लोक इंग्रजी पाठोपाठ हिंदी भाषेचा दैनंदिन नामध्ये उपयोग करतात. हिंदी भाषेला भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आहे. 

    

     ऑलिंपिक सारख्या जागतिक खेळांचे निवेदन आपण मध्ये ऐकतो आहे. हा हिंदी भाषेचा गौरव आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी डाॅ. अनिल गवळी, प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार,महाविद्यालयाचे कॅन्टीन चालक राहुल भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. एस. एन. खरूजकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हिंदी भाषेत दाखले दिले. प्रासंगिक इतिहास सांगून वैश्विक हिंदी भाषेचे महत्व सांगितले. प्रा. जी. जे. गावडे यांनी सुत्रसंचालन केले. आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment