तथाकथित मानवी प्रगती सृष्टीच्या विनाशास कारणीभूत - प्रा. राहुल पाटील, चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालयात भूगोल दिन - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2023

तथाकथित मानवी प्रगती सृष्टीच्या विनाशास कारणीभूत - प्रा. राहुल पाटील, चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालयात भूगोल दिन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          पृथ्वीवर माणसाने आगमन केले आणि हळूहळू नैसर्गिक साधन संपत्तीचा स्वार्थासाठी वापर सुरू झाला. जंगल म्हणजे सृष्टीचे फुफुस होय. वाढत्या जंगलतोडीमुळे  विनाश सुरू आहे. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. निसर्गाशी संवादी शैलीने जीवन जगल्यास पृथ्वीचे अस्तित्व सुरक्षित राहील. अन्यथा प्रलयाला सामोरे जाण्याची भीती आहे.' असे मत  प्रा. राहुल पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील भूगोल दिन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर.  पाटील यांनी पृथ्वीवरील मानवी आक्रमण वेळीच रोखले गेले पाहिजे आणि पृथ्वीवरील निसर्ग, वन्यजीव, नैसर्गिक साधन स्रोत यांचे रक्षण करण्यासाठी व्यापक प्रबोधन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. 

      प्रारंभी समन्वयक डॉ. एन. एस. मासाळ यांनी भूगोल हा एक अत्यंत  महत्त्वाचा विषय असूनही त्याची प्राथमिक पातळीवर प्रचंड उपेक्षा होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच भूगोल तज्ज्ञ सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिवस भूगोल दिन म्हणून १९८८ पासून साजरा केला जातो. ही माहिती देऊन त्याची आवश्यकता प्रतिपादन केली. बी. एम. पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर कु. निकिता वर्पे हिने आभार  मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment