कडलगे बुद्रुकच्या सरपंचपदी परशराम पाटील तर उपसरपंचपदी प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2023

कडलगे बुद्रुकच्या सरपंचपदी परशराम पाटील तर उपसरपंचपदी प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड

परशराम पाटील

प्रा. ज्ञानेश्वर पाटील
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

    कडलगे  बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंचपदी प्रा. ज्ञानेश्वर रामभाऊ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीच लोकनियुक्त सरपंचपदी गावातील भावेश्वरी दूध संस्थेचे सेक्रेटरी परशराम धोंडीबा पाटील यांची  निवड झाली आहे. तर उपसरपंच हे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

    गुरुवार दि. १२ रोजी उपसरपंच  निवडणुकीनंतर सरपंच व अन्य सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्या देव जोतिबा तरुण विकास आघाडीचे ८ सदस्य तर विरोधी गटाचे २ सदस्य ही उपस्थित होते. यामध्ये महादेव धोंडीबा कांबळे, तुषार संतराम कांबळे, वैशाली विठ्ठल गिरीबुवा, कमल हिंदुराव कांबळे, दीपा तुकाराम पाटील, सुधा रमेश कांबळे, तुकाराम रामू पाटील, विद्या आनंद रेडेकर, उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता बी. डी. यादव यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक सुनील पुजारी यांचे सहकार्य लाभले. 

      यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तानाजी पाटील, गावडू पाटील, नरसिंग पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे, लक्ष्मण कांबळे, अमोल कांबळे, सचिन पवार, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment