सुंडीत येथे विकास कामांना सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2023

सुंडीत येथे विकास कामांना सुरुवात

 


चंदगड/प्रतिनिधी 
सुंडी (ता. चंदगड)  अंतर्गत रस्ता काम व जलजीवन नळपाणी योजनेचा शुभारंभ आम. राजेश पाटील यांच्या हस्ते  करण्यात आली. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष झिमाना निंगापा पाटील होते. 
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. यावेळी आम.पाटील यानी गावचा विकास साधायचा असेल तर ग्रामस्थांमध्ये एकजूट हवी. एकीच्या बळावर विकास कामांचा डोंगर उभा करता येतो. सुंडीच्या विकासकामांत नेहमी मदत करु अशी ग्वाही दिली. यावेळी २०लाखाच्या अंतर्गत रस्ता कामाला शुभारंभ तसेच ३७लाख रूपयांच्या जलजीवन नळपाणी योजनेचा भूमिपूजन व फलक अनावरण आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच मनोहर कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांनी जिल्हा स्तरावर सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक व लहान गटात द्वितीय क्रमांक तसेच जनरल चॅम्पियशिप मिळविल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचा आम. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  वाळकेश्र्वर सेवासंस्थेचे अध्यक्ष  एनएम. पाटील, तानाजी टक्केकर, उपसरपंच सौ शुभांगी पाटील, सदस्य रामकृष्ण पाटील, धुल्लाप्पा सरशेट्टी, सदस्या सौ. निता पाटील, संजीवनी पाटील, पोलीस पाटील माधुरी पाटील, वैजनाथ सरशेट्टी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वैजनाथ पाटील, देवळी सर, रोहिदास पाटील, उत्तम कांबळे, मुख्याध्यापक एस डी घोळसे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.आभार व्ही एस पाटील यानी मानले.


No comments:

Post a Comment