कोगनोळी जवळ अपघातात कोवाड येथील तरुणाचा अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2023

कोगनोळी जवळ अपघातात कोवाड येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

 

शामराव रामू भोगण

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

 कोवाड (ता. चंदगड) येथील थंड पेय एजन्सीचा भागीदारीत व्यवसाय करणारा तरुण  शामराव रामू भोगण (वय ३६ ) याचा कोगनोळी टोल नाक्याजवळ झालेल्या आयशर टेम्पो व ट्रक अपघातात  शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापूर येथून थंड पेयाच्या बाटल्या घेऊन सदर तरुण ड्रायव्हिंग करीत कोवाड कडे येत होता आयशर टेम्पो मध्ये कोवाड चे माजी सरपंच शशिकांत कोरी हे चालक शामराव यांच्या बाजूला बसले होते.

सदर तरुण कोल्हापूरहून चंदगड कडे येत असताना हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजता  झाला.

माजी सरपंच शशिकांत कोरी  हे किरकोळ जखमी झाले आहेत मृत तरुणाच्या पश्चात एक भाऊ बहीण आई-वडील पत्नी असे असा परिवार आहे. बेळगाव येथील डॉक्टर स्वाती भोगण यांचे ते पती होत. कोवाड येथील शिक्षक व पोस्ट खात्याचे विमा सल्लागार मुळीक गुरुजी यांचे ते जावई होत. रविवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments:

Post a Comment