शिक्षक समितीच्या वेंगुर्ला अधिवेशनास 'चंदगड' मधून ४०० शिक्षक जाणार - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2023

शिक्षक समितीच्या वेंगुर्ला अधिवेशनास 'चंदगड' मधून ४०० शिक्षक जाणार

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे दिनांक १५ व १६ फेब्रुवारी ला संपन्न होत आहे. या अधिवेशनाला चंदगड तालुक्यातून ४०० शिक्षक जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धनाजी पाटील व सरचिटणीस एन व्ही पाटील यांनी दिली. 

     १६ रोजी समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन होत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, रवींद्र चव्हाण, दादा भुसे, उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदींची उपस्थित रहाणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर स्वागताध्यक्ष असून अधिवेशनात प्रामुख्याने जुनी पेन्शन लागू करावी, एमएससीआयटी मध्ये सूट मिळावी, बदली धोरणात सुधारणा करावी, पदवीधर वेतश्रेणी मिळावी, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबद्दल शिक्षक आग्रही आहेत. अधिवेशनास राज्यभरातून लाखावर शिक्षक उपस्थित राहतील असा अंदाज असून चंदगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक समिती अध्यक्ष धनाजी पाटील, सरचिटणीस एन व्ही पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment