हलकर्णी महाविद्यालयात शुक्रवारी राज्यस्तरीय चर्चासत्र - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2023

हलकर्णी महाविद्यालयात शुक्रवारी राज्यस्तरीय चर्चासत्र

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविधालय व गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवार दि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १० वा. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष IQAC यांचे मार्फत' माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील भाषांचे अध्यापन' (समस्या, परिणाम, उपाय) या विषयावर राज्यस्तरीय  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मोठ्या संख्येने मराठी, हिंदी, इंग्रजी विषय शिक्षकांनी चर्चा सत्रात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 
   चर्चासत्र चार सत्रात संपन्न होणार आहे. प्रथम   सत्रात दौलत विश्वस्थ संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होईल. तर दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा अशोकराव जाधव यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात येईल.  यावेळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे  माजी परिक्षा नियंत्रक मा डॉ. बी. एम. हिर्डेकर बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत.  
   तर दुसऱ्या सत्रात मराठीचे अध्यापन यावर नाईट कॉलेज कोल्हापूर चे मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण शिदे मार्गदर्शन करतील. इंग्रजीचे अध्यापन विषयावर राजाराम कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे मार्गदर्शन करतील आणि हिंदीचे अध्यापन वर शिवाजी विधापीठ माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात एकत्रित चर्चासत्राचे संयोजन डॉ. आय. आर. जरळी व प्रा. एस. एन. खरुजकर करतील. तर चौथ्या सत्रात दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील व सचिव विशाल पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. 
    या चर्चासत्रासाठी भाषा शिक्षकांनी सहभाग  नोंदवावा असे आवाहन महाविधालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर आणि समन्वयक प्रा. पी. ए. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9423840659 या क्रमांकावर संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment