चंदगड तालुक्यात ''जागरूक पालक सुदृढ बालक ''अभियानाचा गुरुवारी प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2023

चंदगड तालुक्यात ''जागरूक पालक सुदृढ बालक ''अभियानाचा गुरुवारी प्रारंभ

 

शालेय विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकिय तपासणी करताना प्रा. आ. केंद्र अडकूरचे पथक

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय चंदगड व चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (अडकूर, माणगाव, कोवाड, हेरे, कानूर, तुडिये) येथे दिवसभर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

   याबरोबर याच दिवसा पासून "जागरूक पालक, सुदृढ बालक"अभियानाची सुरुवात होत आहे. सदरील अभियानांतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासणी, व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत "जागरूक पालक सुदृढ बालक" अभियान राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत चंदगड तालुक्यामध्ये पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय व निमशासकीय शाळा कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, सर्व अंगणवाड्या, खाजगी नर्सरी, बाल वाड्या, खाजगी शाळा व शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुला मुलींची आरोग्य तपासणी ही आरबीएसके पथक, समुदाय आरोग्य अधिकारी, व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार  आहे. तरी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत आपल्या बालकांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ व ग्रामीण रुग्णांलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment