बरंच काही फाउंडेशन तर्फे पोलीस पाटलांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2023

बरंच काही फाउंडेशन तर्फे पोलीस पाटलांचा गौरव

तानाजी कुरळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करताना बरच काही फाउंडेशनचे पदाधिकारी मानपत्र 
गडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा
बरच काही फौंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व पोलीस पाटील क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल चन्नेकुपी, (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील पोलीस पाटील तानाजी रामचंद्र कुरळे यांना 'समाजरत्न पुरस्कार - २०२३' ने सन्मानित करण्यात आले.
 कोल्हापुरी फेटा, भारतीय संविधान, रजत पदक, स्मृतिचिन्ह व डॉ श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान का वाचावे? व का वाचवावे? हे पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान प्रसंगी 'बरच काही फौंडेशन' चे अध्यक्ष संदीप संकपाळ, सौ संकपाळ, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, किर्ती मसुटे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, श्रीपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment