चंदगड
/ सी. एल. वृत्तसेवा
सर्व श्रमिक संघ कोल्हापूर आयोजित गिरणी
कामगार व वारसदार यांचा प्रलंबित मागण्यांसाठी ९ मार्च २०२३ रोजी तहसिल कार्यालय चंदगड
येथे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
गिरणी
कामगार व वारसदारांचे प्रश्न मार्गी लावावे. यासाठी कामगारांनी वेळोवेळी आंदोलने
करूनही सरकारने देखल घेतली नाही. केवळ आश्वासने दिली गेली. मोर्चाची सुरुवात
सोयरिक मंगल कार्यालय चंदगड येथून सकाळी १० वा. सुरू होईल व दु. १२.०० वा तहसिलदारांना
मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. आपल्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. याकरिता
चंदगड तालुक्यातील सर्व गिरणी कामगार व वारसदारांनी या मोर्चामध्ये बहुसंखेने
उपस्थित रहावे. असे आवाहन सर्व श्रमिक संघ चंदगड तालुका अध्यक्ष गोपाळ गावडे,
खजिनदार हणमंत खामकर, पदाधिकारी-कृष्णा मुळीक, प्रकाश
नारळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment