विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती.सासुसह पाच जणांवर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2023

विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती.सासुसह पाच जणांवर गुन्हा दाखल

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          ट्रॅक्टर घेणेसाठी माहेराहून दीड लाख रूपये घेऊन येण्यासाठी सौ.राधा राजू काळे (वय वर्ष २५ रा. वडी, ता. जिंतूर, जि .परभणी) हीचा छळ करून आत्महत्येस कारणीभूत ठरलेबाबत  राजू त्रंबक काळे ( पती), निलाबाई त्रंबक काळे (सासू) विजय त्रंबक काळे (दिर) विठठल चव्हाण ( उसतोड मुकादम चौघेही रा.वडी ता जिंतुर जि.परभणी) व बाळू पाटील ( ट्रक मालक रा .मुदाळ) या पाच जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. २०१९साली राधा हिचे राजू त्रंबक काळे  याचेशी लग्न झाले. लग्नानंतर ४ महिन्यांपासूनच पती राजू काळे,सासू निलाबाई काळे व दिर विजय काळे यांनी संगनमताने वाडी या राहत्या घरी तसेच ईब्राहीपुर (ता. चंदगड, जि. कोल्हापुर) येथे उस तोड चालु असलेल्या ठिकाणी वेळोवेळी टॅक्टर घेणेकरीता दिड लाख रुपये दिले नाहीत यांचा राग मनात धरुन तिस शारीरिक मानसिक त्रास देवून जाचहाट छळ करुन तिस आत्महत्या करणेस प्रवृत्त केले. यासाठी ट्रक मालक बाळू पाटील तसेच उसतोड टोळी मुकादम विठठल चव्हाण यांनी मदत व सहकार्य केले.त्यामुळे मयताचे मामा गजानन नारायण सुर्यवंशी (रा. कमलापूर पो. मजलापूर ता. पुर्णा जि. परभणी) यानी चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून पाच जणांवर भा.द.वि.स.कलम ३०६,४९८ (अ)३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोसई सतपाल काबंळे करत आहेत. No comments:

Post a Comment