चंदगड आगार व्यवस्थापकास जिवे मारण्याची धमकी,पाच जणांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2023

चंदगड आगार व्यवस्थापकास जिवे मारण्याची धमकी,पाच जणांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आम्ही फार डेंजर माणसं आहोत, माझा इतिहास माहीत करून घ्या. यापूर्वी चंदगड पोलीस स्टेशन देखील जाळले आहे. आमच्या मर्जीशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. लवकरात लवकर इथून गाशा गुंडाळून निघून जा, नाहीतर मारून टाकू अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रताप उर्फ पिनू पाटील (रा. तूर्केवाडी, ता. चंदगड), संतोष मळविकर (रा. नांदवडे), राज सुभेदार (हलकर्णी), गजानन गावडे (जंगमहट्टी), जी. एन. पाटील (तूर्केवाडी) पाच जणांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चंदगड आगार व्यवस्थापक अमर राजेंद्र निकम (वय वर्षे ३८ मूळ गाव उदगाव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर प्रकार शनिवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास चंदगड बस डेपो येथे आगार प्रमुख कार्यालयात घडला. आगार व्यवस्थापक अमर निकम    हे आपल्या शासकीय कार्यालयात काम करत असताना प्रताप उर्फ पिनू पाटील, संतोष मळविकर, राज सुभेदार, गजानन गावडे, जी. एन. पाटील  कार्यालयात येऊन लेखनिक सुनील कल्लाप्पा गावडे (रा. गवसे, ता. चंदगड) यांच्याशी शालेय सहलीच्या विलंब शुल्क भरण्याच्या कारणावरून व बिल दाखवून सुद्धा आम्ही भरणार नाही. आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा. तसेच शाळेतील शिक्षकांना बिल भरण्यासाठी संपर्क केलात तर गाडीत घालून उचलून नेईन, अशी धमकी देऊन मारण्यासाठी अंगावर धावून जात असताना निकम थांबवण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करून तू आडवा का आलास, तू अजून या डेपोत कसा काय आहेस. खुर्चीवर गप्प बसायचे, अजिबात उठायचे नाही. असें म्हणून आम्ही फार डेंजर माणसं आहोत
माझा इतिहास माहीत करून घ्या. यापूर्वी चंदगड पोलीस ठाणे जाळले आहे. आमच्या मर्जीशिवाय तुम्ही इथं काम करू शकत नाही. त्यासाठी मोठे आंदोलन करू किंवा येत्या पंधरा दिवसात काहीतरी गंभीर प्रकार घडवून आणू की ज्याची कधी कल्पना ही करू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपला गाशा गुंडाळून येथून निघून जा, नाहीतर मारून टाकू असं म्हणत बदलीचा अर्ज तयार करून स्वतःच मोबाईलमध्ये फोटो काढुन बदनामी करण्याची धमकी दिल्याने चंदगड पोलिसांत या पाच जणांवर भादविस कलम ३५३,१४३,१४७,१४९,५०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. कारंडे अधिक तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment