कोवाड येथे रविवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2023

कोवाड येथे रविवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा

कै. डॉ. डी. व्ही. तोगले


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

चंदगड येथील ताम्रगड प्रतिष्ठान तर्फे माजी प्राचार्य कै. डॉ. डी. व्ही. तोगले यांच्या स्मरणार्थ रविवार दि. ५ रोजी सकाळी ७.३० वा. विविध गटात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता सदर स्पर्धा सुरू होतील. निवृत्त  माजी प्राचार्य कै. डॉ डी व्ही तोगले यांचे सुपुत्र व बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल मधील सर्जन डॉ. मनोज तोगले यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, जिल्हा परिषद सदस्य कलापणा भोगण, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, जेष्ठ क्रीडापटू रामराव गुडाजी, जिल्हा निबंध अरुण काकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी विनोद देसाई, सुधीर नाकाडी, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष  एन. आर. पाटील यांनी केले आहे सदर स्पर्धा रविवार दिनांक पाच रोजी सकाळी कोवाड येथे सकाळी दुर्गामाता चौक येथे सुरू होणार आहे इच्छुकांनी संजय कुट्रे दयानंद सलाम सुभाष बेळगावकर शशिकांत खोराटे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment