वीजेच्या धक्क्याने मृत तरुणाच्या कुटुंबाला २० हजार रुपये तत्काळ मदत - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2023

वीजेच्या धक्क्याने मृत तरुणाच्या कुटुंबाला २० हजार रुपये तत्काळ मदत

मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत देताना

कोवाड : सी. एल. वृतसेवा 

शनिवारी दुपारी बुकीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथे संपत बच्चनहटी या तरुणाचा शेतात काम करत असताना वीज धक्का लागून मृत्यू झाला. त्याला वीज वितरण कंपनी  कडून तत्काळ मदत म्हणून 20 हजार रुपये रविवारी सुपूर्द करण्यात आले . यावेळी  वीज वितरण विभागाचे गडहिंग्लज येथील कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, चंदगडचे महावितरणचे विशाल लोधी, कोवाडचे शाखा अभियंता मगदूम यांच्यासह शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा डॉ दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग बाचुळकर जनार्दन देसाई शिवाजी पाटील, पोलीस पाटील सटूप्पा मेनसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच एक महिन्याच्या आत त्यांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई, तसेच पंधरा दिवसात गतवर्षी दोन म्हैस  विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडल्या  त्याची नुकसान भरपाई देण्यासह नादुरुस्त Demand वीज वाहक लाईन पंधरा दिवसात दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी देण्यात आले.No comments:

Post a Comment