चंदगड तालुक्यातील अंगणवाडीसाठी ५ सेविका व १७ मदतनीस पदांसाठी भरती सुरू, वाचा कोणत्या संधी........ - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

चंदगड तालुक्यातील अंगणवाडीसाठी ५ सेविका व १७ मदतनीस पदांसाठी भरती सुरू, वाचा कोणत्या संधी........चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड पंचायत समिती कडील एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या ३ अंगणवाडी सेविका, २ मिनि अंगणवाडी सेविका व १७ मदतनीस पदासाठी भरती करण्यात येणार असून यासाठी अर्ज मागविण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी वनिता इष्टे यांनी दिली.

     चंदगड तालुक्यातील कुदनूर, चिंचणे, भोगोली येथील अंगणवाडी साठी सेविका, नामखोल व चंदगड नगरपंचायत येथील मिनि अंगणवाडी मिनी सेविका तर चंदगड नगरपंचायत १, कालकुंद्री १, कोवाड २, निट्टुर १, किणी १, नागरदळे १, माणगांव २, हलकर्णी १, खा. सावर्डे १, आंबेवाडी १, लाकुरवाडी १, किरमटेवाडी १, गवसे १, नांदवडे २ येथील अंगणवाडी साठी मदतनीस भरवण्यात येणार आहेत. या पदासाठी  १ ते १४ मार्च २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत असून अधिक माहितीसाठी चंदगड येथील बालविकास सेवा योजना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment