आग विझवायला गेला अन् दुचाकी गमावून बसला !, दुचाकी जळून खा, बेलेवाडी घाटातील प्रकार - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

आग विझवायला गेला अन् दुचाकी गमावून बसला !, दुचाकी जळून खा, बेलेवाडी घाटातील प्रकार


आजरा / सी. एल. वृतसेवा

उत्तूर पासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या बेलेवाडी (ता. आजरा) येथील अज्ञाताने लावलेल्या वणव्यात वणवा विझवण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराच्या गाडीला वणव्या मुळे पेट लागल्याने दुचाकी जळून खाक झाली. दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

    बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास रखखत्या उन्हात नव कृष्णा व्हॅली स्कूल च्या दिशेन बेलेवाडी घाटाकडून वणवा जोरात पेटत असताना उत्तूर - बेलवाडी मार्गावरील ग्रामस्थांना दिसला. नवकृष्णा व्हॅली स्कूल जवळ मारूती घोरपडे यांचे ग्रीन हाऊस आहे. तेथे  वणवा लागण्याची शक्यता असल्याने आजरा येथून गारगोटी कडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने बाजूला गाडी थांबवून आग वणवा विझवण्यासाठी गेला आग विझवत असताना त्यांचे दुचाकी कडे दुर्लक्ष झाले. आग दुचाकीच्या ठिकाणी आग आली अन् दुचाकीने पेट घेतला असता त्यात दुचाकी जळून खाक झाली.

               आग विझण्यासाठी अमृत मगदूम , सौरभ कुंभार , तुषार घोरपडे , रामकृष्ण मगदूम. सुनिल मगदूम आदी सह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली मात्र आग विझवण्यासाठी दुचाकी थांबवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकी स्वाराची दुचाकी पेटल्याने मोठे नुकसान झाले.No comments:

Post a Comment