युवकांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे - सागर चौगुले, 'माडखोलकर' मध्ये कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2023

युवकांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे - सागर चौगुले, 'माडखोलकर' मध्ये कार्यशाळा

व्यासपीठावर बोलताना सागर चौगुले. शेजारी प्राचार्य व प्राध्यापक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        'आजच्या युगात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी  सर्वांकष तयारी करण्याची गरज आहे. परीक्षेस सामोरे जाण्यासाठी योग्य पूर्वतयारी, नियोजन, जिद्द, मेहनत यांची जोड आवश्यक आहे. वेळेचे काटेकोर नियोजन आणि सुस्पष्ट ध्येय असेल तर यशाला गवसणी घालणे शक्य आहे. "असे प्रतिपादन सागर चौगुले यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील शिवराज अग्रणी महाविद्यालय समूहातील पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत बोलत होते. 

      'स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी' या विषयावरील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील हे होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले "विद्यार्थ्यांनी सेट, नेट, गेट, मॅट, आयबीपीएस, या परीक्षांचे स्वरूप समजून घ्यावे. योग्य दिशेने प्रयत्न करताना अभ्यासाचे तंत्र व मार्गदर्शन यांचा योग्य उपयोग कौशल्याने करायला हवा. वाचन, स्मरण, सादरीकरण याकडे लक्ष द्यायला हवे. मन, मनगट आणि मेंदू या तिन्हींचाही विकास झाला तरच व्यक्तिमत्व विकसित झाले असे म्हणता येईल. आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. संश्लेषण, विश्लेषण, तर्क, व्यक्तिमत्व विकास या सर्व बाबींच्याकडे जागरूकतेने पाहायला हवे.``

      प्राचार्य  पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपली विद्यार्थी वृत्ती टिकवून ठेवावी आणि स्पर्धा परीक्षांचा बागुलबुवा न करता यश प्राप्तीसाठी मेहनत घ्यावी असे मत व्यक्त केले. प्रारंभी वृक्षाला जलार्पण करण्यात आले. समन्वयक डॉ. एस. एस .सावंत यांनी कार्यशाळेचा हेतू प्रास्ताविकातून व्यक्त केला. दुसऱ्या सत्रात डॉ. एस.डी. गोरलयांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या सर्व क्षमतांचा कौशल्याने विकास करावा असे आवाहन करतानाच विविध परीक्षांची माहिती दिली.या कार्यशाळेस डॉ. एम. एम. माने, व्ही. के. गावडे, टी. एम. पाटील, एम. एम. पीरजादे, खेडकर यांच्यासह अग्रणी महाविद्यालयातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. टी. ए. कांबळे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment