बेळगाव येथे वॉक्थॉन (चालण्याच्या मॅरेथॉन) स्पर्धा, मधुमेहावरील विजयासाठी 'माधवबाग' चा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2023

बेळगाव येथे वॉक्थॉन (चालण्याच्या मॅरेथॉन) स्पर्धा, मधुमेहावरील विजयासाठी 'माधवबाग' चा उपक्रम


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   पाच हजार वर्षापासून विज्ञान व आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे रोज अडीच ते ३ किलोमीटर चालणे मधुमेहाला दूर ठेवू शकते. चालण्याच्या याच व्यायामाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी 'win diabetes walkthon' हे घोषवाक्य घेऊन माधवबाग क्लिनिक मार्फत बेळगाव येथे 3 किमी  चालण्याच्या (वाक्थॉन) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
     दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता फक्त मधुमेही (डायबिटीस) पेशंट साठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक सर्वेनुसार एकूण डायबेटिस पेशंट पैकी 8% (आठ टक्के) रुग्ण हे हृदयरोगाने ग्रस्त असतात. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 25 मार्च पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. तर 6 एप्रिल पर्यंत हृदयाची कार्यक्षमता तपासून घेणे अनिवार्य आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी 500/- रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली असून यात डॉक्टर समुपदेशन, कार्डियाक रिस्क असेसमेंट (बीपी, एसपीओ 2, इसीजी आणि रँडम ब्लड शुगर तपासणी), हृदयाची कार्यक्षमता तपासणी (स्ट्रेस टेस्ट), रजिस्ट्रेशन किट (वाक्थॉन टी-शर्ट, पाणी बॉटल व सहभाग सर्टिफिकेट) यांचा समावेश आहे. 
     याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पेशंट किंवा व्यक्तींना माधवबाग तर्फे विविध पुस्तके आणि ॲप रजिस्ट्रेशन मोफत मिळणार असून आपण जे उत्कृष्ट मधुमेह मुक्त जीवन अनुभवात आहात त्याची माहिती इतरांना सांगण्याची संधी देण्यात येणार आहे. 'स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले मित्र, कुटुंबियांना प्रेरित करा. 
    मधुमेहावर तुम्ही मिळवलेल्या विजयाबद्दल माधवबाग कडून प्रमाणपत्र मिळवा.' असे आवाहन माधवबाग क्लिनिक, हरी मंदिर शाखा, मेन रोड अनगोळ- बेळगाव च्या प्रमुख डॉ. संगीता खांजे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 8770684156 / 9591563631 हा आहे.



No comments:

Post a Comment