चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कॉमर्स विभागाच्या वतीने चंदगड तालुक्यातील लघुउद्योग हा विषय घेऊन भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, संख्याशास्त्र अधिकारी राजाराम गावडे यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पी. ए. पाटील होते.
या भित्तीपत्रकामध्ये मध्ये ब्युटी पार्लर, रेशीम उद्योग, काजू प्रक्रिया उद्योग, हॉटेल व्यवसाय, पोल्ट्री उद्योग, फर्निचर उद्योग, रोपवाटिका उद्योग इत्यादी असे विविध विषय घेऊन भितीपत्रक संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. व्ही. डी. पाटील यांनी केले. या भितीपत्रकाचा मुख्य उद्देश प्रास्ताविकातून प्रा. जी. जे. गावडे यांनी मांडले यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील अनेक लोकांच्या रोजगारात वाढ झाली आहे व राहणीमानात सुधारणा झाली आहे असे उद्गार काढले. या कार्यक्रमासाठी सौ. एम. एन. पाटील, डॉ.अनिल गवळी, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. सी. बी. पोतदार, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. डी. जे. भोईटे, प्रा. एस. डी. तावदरे, प्रा. यु. एस. पाटील, महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व वाणिज्य विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. माधुरी सुतार हिने केले तर आभार महेश साबंद्रेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment