आजरा / सी. एल. वृतसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथील लक्ष्मी देवीची यात्रा २०२५ साली करण्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती सरपंच किरण आमणगी यांनी दिली. ते भावेश्वरी मंदिर येथे यात्रेसंदर्भात ग्रामस्थांची बैठक झाली त्यावेळी बोलत होते.
सरपंच आमणगी पुढे म्हणाले २०२३ ला देवीची यात्रा करण्याचे नियोजन होते. मात्र नागरिकांची यावर्षी यात्रा घेण्याची मानसिकता नाही, यामुळे ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, ग्रामस्थ व तरुण मंडळी यांच्याबरोबर चर्चा करून २०२५ ला यात्रा करण्याचे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अमृतराव पाटील यांनी धार्मिक कार्याची माहिती दिली. मंगळवारी (दि. १८) भावेश्वरी देवीला गाऱ्हाणे घालण्याचा निर्णय झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, भैरू कुंभार, संभाजी कुराडे, एम. ए. राजाराम, आप्पासाहेब शिंत्रे, मेघशाम आपटे, गौरव धुमे, संजय धुरे, मंदार हाळवणकर, शशिकांत रेडेकर सर्व मानकरी, जेष्ठ मंडळी, युवक वर्ग भावेश्वरी मंदिरात झालेल्या बैठकीत हजर होते. स्वागत अमृत पाटील यांनी तर आभार प्रमोद गुरव यांनी मानले.
No comments:
Post a Comment