चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत हस्ताक्षर शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2023

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत हस्ताक्षर शिबिराचे आयोजन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत दि. १६ ते २२ एप्रिल या कालावधीत हस्ताक्षर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात राजेंद्र शिवणगेकर, मनोहर नाईक, अविनाश दावने हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिर दु. ४ते ५.३०या वेळेत महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे या ठिकाणी होणार आहे. चंदगड तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात भाग घ्यावा. असे आवाहन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र पाटील शिबिर प्रमुख एम. एन. शिवणगेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment