कोवाड केंद्र शाळेत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन शिक्षक व विद्यार्थी.
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३२ व्या जयंतीनिमित्त केंद्र कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत कोवाड, निट्टूर, कामेवाडी, दुंडगे, चिंचणे, मलतवाडी, किणी, घुल्लेवाडी, जक्कनहट्टी, तेऊरवाडी आदी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अध्यापिका उज्वला नेसरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणपती लोहार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रांजल रामा यादव, रसिका गुरुप्रसाद तेली, सान्वी मल्लिकार्जुन वाली, अबूसाहीद दस्तगीर आत्तार, रूपल गोपाळ कांबळे, आरोही कल्लाप्पा वांद्रे, स्वराज अमोल राजगोळकर, लावण्या विष्णू जोशी, याज्ञी परशराम आडाव, आरोही पराग भोसले आदी विद्यार्थ्यांची बाबासाहेबांची महती सांगणारी भाषणे झाली. यावेळी अध्यापिका मधुमती गावस, भावना अतवाडकर, कविता पाटील व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment