माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न, "करिअरच्या संधी आणि क्षेत्रे” या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2023

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न, "करिअरच्या संधी आणि क्षेत्रे” या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        आपल्या स्वप्नाना आकार देण्यासाठी विद्यार्थ्यानी आत्मनिरीक्षण करुन उज्वल भवितव्याचे नियोजन करावे. वाजवी जोखीम पत्करुन निरंतर मेहनत केल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते, बहुसंख्येने विध्यार्थी हे आपले ध्येय निश्चित न करता विविध करिअर मार्ग शोधत असतात. त्याकरीता आपले ध्येय आणि करिअर मार्ग यामध्ये सुसंगता व समन्वय असणे गरजेचे आहे. करिअरच्या अनेक मार्गापैकी 'सद्यस्थितीत कंपनी सेक्रेटरी हे करिअरच्या दृष्टीने एक उत्तम क्षेत्र आहे. याबाबत ग्रामीन विध्यार्थी थोडे उदासिन असल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थ्यांनी डोळसपणे या क्षेत्राकडे पहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाच्या (Company Secretary: Kolhapur Chapter) कंपनी सेक्रेटरी चेअरपर्सन श्रीमती कपिला टिक्के यांनी केले. त्या येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने आयोजित “करिअरच्या संधी आणि क्षेत्रे” या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्ह्णून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते. 

        प्रारभी वाणिज्य विभाग प्रमुख व चर्चा सत्राचे समन्वयक डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करुन चर्चा सत्राचा हेतू विशद केला. श्रीमती कपिला टिक्के पुढ म्हणाल्या, आज सुमारे वीस लाख पदे रिक्त असून फक्त ७५००० कंपनी सेक्रेटरी उपलब्ध आहेत. रुढ चाकोरी पेक्षा थोडी वेगळी वाट चोखाळली तर निश्चितच उज्ज्वल भवितव्याची संधी या क्षेत्रात आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर विसंबून न राहता प्रात्यक्षिक ज्ञानाकडेही लक्ष द्यावे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात भावी यशस्वी जीवनाची बीजे असल्यामुळे व्यक्तिमत्व विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास ते निश्चितच यशाला गवसणी घालू शकतात, असे मत व्यक्त केले. 

           यावेळी दूस-या सत्रात श्रीमती राजश्री लाम्बे लंबे यानी कम्पनी सचिव (CS), चार्टर्ड आकौंट्न्टट (CA), इंडीयन कॉस्ट अंड वर्क्स आकौंट्न्टट (ICWA), भारतीय व्यवस्थापन संस्था(IIM), ई. संस्था अणि तेथील कोर्सचा सविस्तर आढावा करिअर संधी म्ह्णून विध्यार्थ्यांसमोर ठेवला. त्याशिवाय त्यानी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सुलभ भाषेत समजावून दिला. या चर्चासत्रात महाराष्ट्र व कर्नाट्क मधून २१० विध्यार्थी सहभागी होऊन त्यापैकी ५२ विध्यार्थ्यानी आपले पेपर सादरीकरण केले. सूत्रसंचालन डॉ. एन. एस मासाळ यांनी केले. तर आभार डॉ. ए. वाय. जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment