वडिलोपार्जित जमिनीवर कर्ज काढण्यास विरोध केला म्हणून आमरोळी येथील महिलेला मारहाण - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2023

वडिलोपार्जित जमिनीवर कर्ज काढण्यास विरोध केला म्हणून आमरोळी येथील महिलेला मारहाण

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

            वडिलोपार्जित जमिनीवर वडिलांच्या संम्मतीशिवाय कर्ज काढण्यास विरोध केला म्हणून आमरोळी (ता. चंदगड) येथील सौ. वसुंधरा विजयकुमार काबंळे (वय वर्ष ४८) या महिलेला व विजयकुमार तुकाराम काबंळे या दोघांना राजगोळी येथील कल्लेश आप्पाजी काबंळे व दत्तू आप्पाजी काबंळे या दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी माराहण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काल आमरोळी येथे घडली.

      याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी की फिर्यादी वसुंधरा काबंळे यांचे आरोपी  कल्लेश व दत्तु काबंळे हे नात्याने भाचे लागतात.राजगोळी खुर्द येथे अर्जुन दोडकल्लोबा काबंळे यांच्या नावे असलेल्या जमिनीवर कर्ज  काढण्यासाठी कल्लेश व दत्तु यानी प्रयत्न चालवले होते. याचा सुगावा लागताच सौ. वसुंधरा काबंळे यांनी विरोध केला. याचाच राग मनात धरून काल आमरोळी येथे येऊन दोघांनी मिळून वसुंधरा व साक्षीदार असलेले तीचे पती विजयकुमार काबंळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी माराहण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वसुंधरा काबंळे यांनी चंदगड पोलीसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोहेकॉ जमीर मकानदार करत आहेत.
No comments:

Post a Comment