बंगळूर : सन्मानचिन्ह सह ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मनोळकर व एन. एस. पाटील आदी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
हिंडलगा (ता. बेळगाव) येथील ग्रामपंचायतला राज्य शासनाकडून गांधीग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार दोन बंगळूर येथील एका कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर, मूळचे सुंडीचे (ता. चंदगड) व सध्या ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक एन. एस. पाटील, ग्रामपंचायत सेक्रेटरी सुखदेव कोलकार, दुर्गाप्पा कांबळे ग्रामपंचायत क्लर्क संतोष नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्र परिसर नेहमी स्वच्छ ठेवून स्वच्छता अभियाना उपक्रम प्रभावपणे राबवल्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर, उपाध्यक्ष भाग्यश्री कोकीतकर यांच्यासह अन्य सर्व सदस्यांच्या परिश्रमामुळे सदर पुरस्कार मिळाला असून सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment