नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नाने नवीन वसाहतमधील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलला, विजपुरवठा सुरळीत - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2023

नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नाने नवीन वसाहतमधील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलला, विजपुरवठा सुरळीतचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नवीन वसाहत वॉर्ड क्र. २ मधील गणपती मंदिर समोरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. रविवार दि. १६/०४/२०२३ रोजी अचानक लाइट बंद असल्याची सुचना समीर पाटील, जहांगीर पटेल आणि सचिन घोडके यांनी नगरसेवक दिलीप चंदगडकर यांना कळविले. नगरसेवक श्री. चंदगडकर यांनी विज पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क  करुन तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सुचना करण्यात आली. याची दखल घेऊन सोमवार दि. १७/०४/२०२३ रोजी नविन ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन वसाहत मधील नागरिकांची लाइट संदर्भातील समस्या दूर करण्यात आली.

        यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उमर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य राजीव चंदगडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पिळणकर, सुरेश बुरुड, समिर पिळणकर, आकाश चंदगडकर, शुभम चंदगडकर, रवी शिरगे, लक्षमण हळदणकर, विजय कांबळे, राजू सावंत, शिवाजी कुंभार,  श्री. देसाई, माजी पोलीस अधिकारी विनायक कांबळे, विज पुरवठा अधिकार श्री. लोदी व श्री. खोराटे व कर्मचारी आणि सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. नगरसेवक श्री. चंदगडकर यांच्या तत्पर कार्यामुळे नवीन वसाहत वॉर्ड क्र. २ मधील विजेचा प्रश्न सुटल्याने लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment