चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत हद्दीतील नवीन वसाहत वॉर्ड क्र दोन मधील खराब झालेल्या हात पंपाची पाहणी करून नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नातून हि दुरुस्ती करण्यात आली. १९९२ साली नवीन वसाहतीचे ग्रामपंचायत सदस्य उमर पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये या हातपमपाची उभारणी केली होती. वॉर्डातील जेष्ठ नागरिक, युवक व इतर लोकांच्या उपस्थितीत पंपाचे सुशोभीकरण करण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उमर पाटील यांच्या हस्ते हातापंपाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिलीप महादेव चंदगडकर, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळाहेब घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य उमर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पिळणकर, भाजप कार्यकर्त्यां सौ. माधुरी भोसले, सलीम सय्यद, राजू सावंत, सुर्यकांत शिरसाठ, देसाई, शिवाजी कुंभार, लक्षमण हळदणकर आदी उपस्थित होते.
चंदगड पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment