चंदगडच्या तहसिलदारपदी राजेश चव्हाण रुजू - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2023

चंदगडच्या तहसिलदारपदी राजेश चव्हाण रुजू

राजेश चव्हाण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तहसीलदारपदी राजेश चव्हाण हे आज  कार्यालयात रुजू झाले. विद्यमान तहसिलदार विनोद रणावरे यांची माढा (जि. सोलापूर) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्या पदावर राजेश चव्हाण यांची नियूक्ती करण्यात आली आहे.

श्री. चव्हाण हे यापूर्वी माढा तहसीलदार  होते. पुनर्वसन खात्यातही त्यांनी सेवा बजावली आहे. गडहिंग्लज येथेही त्यानी सेवा बजावली आहे. आज चंदगड तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला नंतर चंदगड तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी नायब तहसीलदार अशोक पाटील, चंदगडचे मंडल अधिकारी अमर पाटील, उप लेखपाल शंकर मुतकेेकर, देवीदास तरडे, आप्पासाहेब जिरनाळे, महसूल अव्वल कारकून विलास पाटील, पुरवठा अधिकारी सचिन गाडीवड्डडर, चंदगड तलाठी दीपक कांबळे, लिपिक राजु माळी, गौस मकानदार, डी. एन. नाईक, आदीसह चंदगड तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment